दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
घुग्घुस दि.१९ आगष्ट २०२२ शुक्रवार रोजी
घुग्घुस पोलीस स्टेशन तर्फे गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात येथील गणेशोत्सव मंडळाची व शांतता कमेटीची बैठक बोलावली होती. ही बैठक पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक बबन आर. पुसाटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याप्रसंगी निरीक्षक बबन आर. पुसाटे यांनी गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाने काटेकोर नियम पाळावे, नियमाचे उल्लंघन होऊ नये याकडे लक्ष द्यावे, प्रदूषण होऊ नये व इतर समाजाला किंवा जेष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये याची प्रत्येकाने दखल घ्यावी, मिरवणूक काढतांना फटाके उडवू नये, वेळेनुसार गणपतीचे विसर्जन करावे अशी सूचना त्यांनी केली. तसेच जी मंडळे नियमाचे उलंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा ईशाराही देण्यात आला.यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, शांतता कमेटीचे सदस्य, तहसील कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी, नगर परिषदचे अधिकारी तसेच नागरिक या बैठकीला उपस्थित होते.