दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
जालना जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने जागतिक छायाचिञ दिनाचे औचित्य साधुन जागतिक छायाचिञ दिन महोत्सव 2022 या कार्यक्रमाचे आयोजन जालना शहरातील मातोश्री लाॅन्स येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे माजीमंञी मा.श्री.बबनराव लोणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.भास्करराव अंबेकर, माजी उपनगराध्यक्ष मा.श्री.राजेशजी राऊत,मिस इंडिया सेंकन्ड रनर सौ.अंजली शर्मा,मराठी सिनेअभिनेञी विदुला बाविस्कर,अभिमन्यु खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भानुदास नाना घुगे,अशोक पांगारकर,श्री.चंद्रकांत धाडवे,गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना माजीमंञी बबनराव लोणीकर,शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांच्यासह आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष मधुसूदन दंडारे,असोसिएशनचे अध्यक्ष श्री.अनिल व्यवहारे,उपाध्यक्ष मोहन मिटकरी,सचिव रवि धांडे,कोषाध्यक्ष शाम सातपुते,सहसचिव वसंत चौधरी आदींनी प्रयत्न केले.