दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून नावलौकिक असलेली यंदाची वर्षा मॅरेथॉनचे आयोजन २१ ऑगस्टला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे मुख्यालय असलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे सकाळी सात आयोजित करण्यात आली आहे.
या कोकण वर्षा मॅरेथॉनचे यंदाचे सातवे वर्ष असून या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या धावपटूंची वयोगटानुसार मुले-मुली अशी वेगवेगळी वर्गवारी करण्यात आलेली असून स्पर्धेत १० वर्ष वयोगटासाठी एक कि.मी,१४ वर्ष वयोगट चार कि.मी,१७ वर्ष वयोगट सहा कि.मी तर १९ वर्ष वयोगटासाठी दहा कि.मी अंतर अशी अट संस्थेकडून ठेवण्यात आली आहे.त्याचप्रमाणे खुल्या गटात सहभागी होणाऱ्या धावपटूंसाठी २१ कि.मी अंतर असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.या वर्षीच्या कोकण वर्षा मॅरेथॉन मध्ये इच्छुक धावपटूंना सहभागी होण्यासाठी पोलीस अकॅडमी कार्यालय झडपोली येथे अर्ज करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले होते.