दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – प्रा. अंगद कांबळे
आज दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा म्हसळा व ज़िल्हा रायगड यांचे वतीने मा. पोलीस निरीक्षक आणि मा. तहसीलदार यांचे द्वारा महाराष्ट्र चे मुख्यमंत्री यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 9 वर्ष होत असून हीं अद्याप खरे खुनी आणि सूत्रधार यांना पकडण्यात टोकाची दिरंगाई होत आहे या बाबत निवेदन देऊन लवकरात लवकर खरे सूत्रधार शोधावेत अशी मागणी करण्यात आली.
फुले शाहू आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला दाभोलकर यांच्या खुणाने लागलेला कलंक लवकर मीटवण्यासाठी सरकार ने वेगाने आणि प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन या वेळी ज़िल्हा कार्याध्यक्ष विनयकुमार सोनवणे यांनी केले. तर समाजात वैज्ञानिक विचार, संविधानिक विचार रुजवन्यासाठी दाभोलकर, पानसरे यांचे विचार घेऊन आम्ही अधिक जोमाने काम करू असा निर्धार म्हसळा शाखा कार्याध्यक्ष जयसिंग बेटकर यांनी व्यक्त केला.
यावेळी ज़िल्हा पदाधिकारी प्रा. डॉ. संजय बेंद्रे, रुपेश गमरे यांनी देखील समाजात विवेकी विचार रुजवण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी शाखा उपाध्यक्ष प्रा. भोसले, शाखा प्रधान सचिव प्रमोद भांजी, शाखा पदाधिकारी सरपंच चंद्रकांत पवार, पत्रकार , अंकुश गाणेकर, अंगद कांबळे सिद्धांत शिंदे, संभाजी शिंदे, सुहेल नाझिरी, आणि इतर पदाधिकारी, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.