दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
तालुकाध्यक्ष हनुमंतभाऊ लांडगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
लोहयात शिवा संघटनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
लोहा शहरात दिनांक २० आॅगस्ट २०२२ रोजी आझादी का अमृत महोत्सव व शिवा संघटनेचे लोहा तालुका अध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच यावेळी हनुमंत भाऊ लांडगे यांच्या वर यावेळी शुभेच्छांचा वर्षाव झाला
यावेळी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण, शेवडीचे सरपंच कैलास धोंडे, नगरसेवक संदीप दमकोंडवार, मनोहर भोसीकर, देवला तांडाचे सरपंच अर्जुन राठोड, मानसपुरीचे सरपंच बालाप्रसाद मानसपुरे. दामोधर वाके, वाळकेवाडीचे सरपंच राजू महागावकर, देऊळगाव चे सरपंच मारोतराव सोनवळे, किरोडयाचे माजी सरपंच जोंधळे, शिवा कर्मचारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, शिवा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोडके, शिवा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष साधू पाटील वडजे, संदीप घोरबांड, सखाराम माणिकराव घोडके, साईनाथ बावनपले, तुळसीराम मुलुकपाडे, यांच्यासह पत्रकार बांधव , व्यापारी , शेतकरी, लोहा शहरातील अनेक मान्यवरांनी नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन शिवा संघटनेचे तालुका उपाध्यक्ष साधू पाटील वडजे, सखाराम माणिकराव घोडके, यांच्यासह ९८ आदीनी या रक्तदान केले .
सदरील रक्तदान केलेल्या पिशव्या चे संकलन श्री गुरु गोविंदसिंघजी सेवा प्रतिष्ठान संचलित जनकल्याण साखळी आणि वैद्यकीय सेवा संलग्नित गोळवलकर गुरुजी रक्त केंद्र बंदाघाट रोड वजीराबाद नांदेड यांनी केले व
सदरील रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ घोडके, सुर्यकांत आणेराव, मुकेश भालके, चंद्रकांत बेंद्रे,हरी वडे, अंकुश सोनवळे, ईश्वर कांजले, सखाराम घोडके, शेखर शेटे, शुभम ठाकूर , आदीने परिश्रम घेतले.