दैनिक चालु वार्ता नाशिक प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर
चौंडेश्वरी देवीच्या कृपेने कार्यरत असणा-या अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेची त्रैवार्षिक कार्यकारिणी ची सर्वसाधारण रविवार दिनांक १९/९/२०२२रोजी कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री.विजय लोळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११वाजता श्री चौंडेश्वरी माता मंदीर,मधली गल्ली,येवला,जिल्हा-नाशिक येथे आयोजित केलेली आहे.सभेत मागिल सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचुन मंजूर करणे,मागिल आर्थिक वर्षाच्या ताळेबंदास मंजुरी देणे,कार्यकारिणी अध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड करणे,मा.अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणा-या विषयांवर चर्चा करणे.हे विषय चर्चिले जाणार आहेत.तरी सभासदांनी अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या त्रैवार्षिक कार्यकारिणी सर्वसाधारण सभेस उपस्थित रहावे,असे आवाहन महासचिव रविंद्र वरुडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मनोज भागवत-८२७५२९२४८३,अमोल आसलकर-९४२३५०५५७३,गणेश खळेकर-९८८११६९३२३,रोशन आदमाने-९८५०२७४९०३यांच्याशी संपर्क साधावा.