दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-दैनिक चालु वार्ताचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत नाथे यांनी भा.ज.यु.मो.चे जिल्हाध्यक्ष मनिष मेन यांची भेट घेतली व त्यांच्या वाढदिवसानिमित्य वृक्षारोपण करून शुभेच्छा दिल्या.जिल्ह्यात ठिक-ठिकाणी भा.ज.यु.मो.च्या कार्यकर्त्यांनी युवा जिल्हाध्यक्ष यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा केला.
यावेळी भा.ज.यु.मो. जिल्हाध्यक्ष म्हणाले की,कार्यकर्ता हा कार्य देणारा सेवक हा त्यागी,बुद्धिमान व निष्काम भावनेने कार्य करणारा असावा.तो स्वाभिमानी असावा.त्याला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव असावी.तो सत्य,मर्यादा,प्रेमाचे आचरण करून तत्व,शब्द व नियमाने वागणारा असावा.तो स्वतःची जबाबदारी सांभाळून,भगवत प्रिय कर्म करणारा असावा.त्याला परमेश्वरी कृपेची ओळख असावी.आशा-निराशा, यश-अपयश,मान-अपमान,स्तुती-निंदा हि द्रव्य जीवनात आली तरी ती सहन करण्याचे त्याच्यात मानसिक आत्मबल असावे असे अमरावती जिल्हा ग्रामीण भा.ज.यु.मो.चे जिल्हाध्यक्ष मनिषजी मेन यांनी उपस्थित नागरिकांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे,शहराध्यक्ष जयेश पटेल,संदीप राठी,राजेंद्र रेखाते,ऍड.पद्माकर सांगोळे,मनोहर मुरकुटे,विनोद दुर्गे,हर्षल पायघन,रतन भास्कर,मिलींद गोतमारे,विक्रम पाठक,रितेश आवंडकर,प्रवीण पटूकले,सुनील लोणकर,नितीन दातीर,अमोल काळे,अविनाश रेखाते,अंकुश जावरकर,आकाश धर्मे,हर्षल रेखाते,नितीन सोनटक्के,किशोर सोनटक्के,अंकित अस्वार,जितू अस्वार,शरद धुळे,आनंद सोनटक्के तसेच लहरी मित्र मंडळ व जय हनुमान गणेश मंडळाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.