दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज परभणीत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी व परभणी जिल्हा शारिरीक शिक्षण व शिक्षक महासंघ विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार, दि. २९ ऑगस्ट २२ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन चे उद्घाटन परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी हिरवा झेंडा फडकावून केले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, राष्ट्रीय क्रीडा दिन व फिट इंडिया निमित्ताने आयोजित मॅरेथॉन स्पर्धा
जिल्हा स्टेडियम मैदान ते काळी कमान दरम्यान पाच कि.मी. अंतरावरा दरम्यान आयोजिली होती. या मॅरेथॉन स्पर्धेत २१ खेळ संघटनांचे कार्यकर्ते, अधिकारी व पदाधिकारी यांचा सहभाग होता. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सदर स्पर्धावेळी असंख्य प्रेक्षक चाहत्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.