दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर.
पुणे : येरवडा येथे मोटार चोरीच्या फसवणुकीचा एक गुन्हा घडला. या प्रकरणी उत्कर्ष साळवे वय ३६ रा. फुलेनगर, आरटीओ जवळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुष्पा सतीश जैन रा. फुलेनगर, येरवडा यांनी फिर्याद दिली आहे.
जैन आणि साळवे ओळखीचे आहेत. साळवे हा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात एजंट म्हणून काम करतो. तो वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार करतो. जैन यांनी साळवेला विश्वासाने बारा लाख किंमतीची मोटार दुरुस्तीसाठी दिली होती. साळवेने जैन यांच्या मोटारीची परस्पर विक्री केली. आपली फसवणूक झाल्याचे जैन यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी साळवेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे पुढील तपास करत आहेत.