दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
कोरेगांव तालुक्यांतील वाठार पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये असलेल्या सोळशी व बनवडी गावच्या डोंगरात असलेल्या पवनचक्क्यामधील केबल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने वाठार पोलिसांनी सखोल तपास करीत सराईत गुन्हेगारांच्या वाठार पोलिसांनी आवळल्या. याबाबत पोलीस सूत्राकडूंन मिळालेल्या माहितीवरुन दि. 28 ऑगस्ट रोजी सोळशी बनवडी गावच्या डोंगरामध्ये असलेल्या पवनचक्कीच्या केबल वायरच्या चोरीच्या तक्रारी पोलीस ठाण्यांत दाखल होत होत्या. सदर गुन्हा करण्यासाठी आरोपींनी खरेदी केलेल्या धारदार कट्टर,एकसाब्लेड यांची पावती गुन्हा घडेल या ठिकाणावरुन मिळाले असता सदर पावतीवरुन कोणत्याही दुकानांचे नाव व पत्ता नसताना त्यावरील हस्ताक्षराचे नमुना वरुन सदर हस्ताक्षरची व दुकानाची सातारा जिल्ह्यांत माहिती घेवुन तिथून कट्टर व एक्साब्लेड खरेदी करुन अज्ञांत इसामांनी सातारा येथील वेगवेगळ्या दुकानांतील सी.सी.टी.व्ही फुटेच्या आधारे माहिती घेवुन वाठार पोलिसांनी त्या आरोपींच्या सखोल तपास केला असता आरोपीनी चोरी करण्यासाठी व्हॅगनर गाडी वापरल्यांचे पोलीस तपासांमध्ये निष्पन्न झाले. एका आरोपीच्या मोबाईल लोकेशन टॅक्स करीत वाठार पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले सातारा इथून त्या चारही आरोपींना वाठार पोलीस ठाण्यांत आणून गुन्ह्यांतील २५, ०००/ रुपये किमतीचे केबल वायर्स व गुन्ह्यांत वापरलेली गाडीसह ताब्यांत घेवुन वाठार पोलीस स्टेशनला त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यांत आली. तसेच पोलीस रिमांड घेवुन आरोपींची बोलती बंद करीत त्यांनी सोळशी, बनवडी या ठिकाणी पवनचक्कीचे केबल वायर चोरी केल्यांची कबुली वाठार पोलिसांना दिली त्यांच्याकडूंन एकूण १,४१ ०००/ रुपयांचे केबल / तांबे माल व ३,०० ०००/ रुपये किमतीची व्हॅगनर कार असा एकूण ४,४१,००० / रुपयांचा मुद्देमाल वाठार पोलिसांनी हस्तगत केला. सदरची कामगिरी मान्यनीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय बोंबले पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला पुढील तपास पोलीस हवालदार विठ्ठल धायगुडे करीत आहेत.