दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर तालुक्यातील अत्यंत दुःखद बातमी भुत्तनहिप्परगा नाथनगर येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका मुलाचे मृत्यू झाले. सविस्तर वृत असे कि नाथनगर भुत्तनहिप्परगा चौरस्ता येथे वास्तविक राहणाऱ्या नवनाथ कांबळे यांना दोन मुलं होते तो थोरला मुलगा आपल्या अजय प्रभू रेड्डी या मित्रासोबत तलावात पोहणी शिकण्यासाठी गेला दोघालाही पहोनी परिपूर्ण येत नव्हती, अजय नवनाथ कांबळे वय अठरा वर्ष हा मुलगा पोहत गेल्याने पाण्याचा अंदाज नकळाल्यामुळे तळ्यात बुडून मृत्यू झाला. त्याचा मित्र अजय रेड्डी आरडाओरडा केल्याने गावातील नागरिक येजो प्रर्यंत अजय कांबळे याचा मृत्यू झाला. व पोलिस ठाणे मरखेल येथे कळवण्यात आले, पोलिस प्रशासनाने मयत मुलाची प्रेतबाँडी मच्छीमारांच्या मदतीने बाहेर काढून प्रेत ताब्यात घेतले, व हाणेगाव येथे आरोग्य रुग्णालयात पी. एम. साठी आणण्यात आले. पी. एम करुन श्वविछदनासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.