दैनिक चालु वार्ता वार्ता उपसंपादक -दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यातील पाथरी तालुका, मौजे हदगाव येथे श्री विठ्ठल-रुख्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा विधिवत पूजा-अर्चा करुन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सोमवार, दि. २९/०८/२२ रोजी आयोजित या धार्मिक सोहळ्यासमयी उपस्थित स्वामी मनीषानंद महाराज पूरी यांच्या शुभ हस्ते सदर मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण विधिवत करण्यात आले.
नखाते परिवारातील सदस्यांच्या सहभागातून निर्माण देवालय आकर्षक व सुशोभित असे बनविले गेले आहे.
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांच्यासह हजारो भाविक भक्तांची मांदियाळी उपस्थित होती. श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर निर्मितीमुळे सर्वत्र आनंदमयी असे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रसंगी नामांकित अशा भजनी मंडळीं द्वारा सुश्राव्य असा भजन गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.