दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका हेटी
कोरपणा तालुक्यातील असून दिनांक 31/8/2022 सकाळी आठ नऊ च्या सुमारास सदर घटना असून हेटी येथील गिरसावळे त्याच्या शेतातील असलेलेल्या डिपीवर जनमित्रा च्या सांगण्यावरून वसंता रामचंद्र आगलावे वय 38 रा. कोडशी बू हा खाजगी मंजूर डिपीवर येणार्या विद्युत पुरावठा पोलवर दुरुस्तीचे कामकरित होता त्याने पोलवरील दोन झापर जोडले व तिसरे झापर ला जोडते वेळेस विद्युत पुरावठा अचानक सुरु झाल्याने करंट लागून पोलवरून जमिनीवर पडला व त्याला गंभीर इजा झाली त्याला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालंय कोरपणा येथे उपचारासाठी आणण्यात आले मात्र गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर ला पाठवण्यात आले सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन कोरपना येथे देण्यात आली कोरपना पोलिस स्टेशन चे ठाणेदार ढाकणे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस देवकते मेजर व पोलीस बिबिशन खटके यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करित आहे .सदर घटना महावितरनच्या निष्काजी मुळे झाली असून महावितरणाच्या अधिकारी कर्मचारी हे स्वता काम न करता मजूरीचे मानस लावत आहे स्वता मजुरीचे पैसे देत आहे मात्र यामुळे काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षा नाही याचे काही कमिजास्त झाले तर या घटनेला जबाबादार कोण महावितरण की ठेकेदारीत लावणारा कर्मचारी आजच्या घटनेत काम महावितरणाचे काम करित होता काम करण्यास सांगणारा कर्मचारी महावितरणाचा त्यामुळे महावितरण ने अपघात झालेले वसंताच्या दवाख्याचा सर्व खर्च व कुटुंबंला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे वसंता हा कमावता असल्यामुळे ध्त्याच्या कुटुंबंयावर उपासमारीची वेळ आली आहे .महावितरण कडे त्याचे कर्मचारी असताना खाजगी मंजूर लावून त्याच्या जीवाशी खेळत आहे तरी समंधित घटनेस कारणीभूत असलेल्या कर्मचारी आपरेटरवर कार्यवाही होने गरजेचे आहे यापुठे अशा घटना घडणार नाही.