दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध सार्वजनिक कार्यक्रमावर सरकारने निर्बंध लावले होते या वर्षी निर्बंधमुक्त उत्सव असल्याने शहरातील काँग्रेस पक्षाच्या वतीने मोंढा परिसरातील गणपती मंदिराजवळ दहीहंडी उत्सवाचे आयोजित करण्यात आला होते.या दहिहंडीच्या उद्घाटनप्रसंगी नांदेड महापालिकेच्या महापौर जयश्री पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी आंबुलगेकर, काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष गोविंदराव नागिलीकर,राहुल हाबर्डे यांच्या दहिहंडी फोडून आतिषबाजी करुन नांदैड येथील स्वरमधूर आर्केष्ट्रा या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.डिजेच्या तालावर तरुणाई जल्लोष साजरा केला तरुणाईच्या उत्साहपूर्ण वातावरणने होंडा परिसर हाऊसफुल्ल झाला होता. या दहीहंडी उत्सवामध्ये अनेक गोविंद पथक दाखल झालै होते.मराठा गोविंदा मित्र मंडळ नांदेड, सीता गोविंद पथक कंधार, जय बजरंग गोविंद पथक लोहा या गोविंदा पथकाने सहभाग नोंदवला. पाच थरांवर असलेल्या दहीहंडीला फोडण्यात यश जय बजरंग लोहा गोविंदा पथकाने ३१ हजार १११ हजारांचे प्रथम बक्षिस पुरस्काराचा मान मिळवला तर द्वितीय पारितोषिक २१ हजार १११ मराठा गोविंदा मित्र मंडळ नांदेड यांनी पटकाविले, तिसरे पारितोषिक सीता नगर गोविंदा पथक कंधार यांने ११ हजार १११ तिसरे बक्षीस मिळवले.
कार्यक्रमाचे आयोजक माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, सोनू संगेवार, माजी बांधकाम सभापती पंकज परिहार व लोहा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती .या कार्यक्रमाला लोहा तालुका अध्यक्ष रंगनाथ भुजबळ, कंधार तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे, शहराध्यक्ष वसंत पवार, नगरसेवक बबन निर्मले ,संभाजी चव्हाण,माजी नगरसेवक उत्तम महाबळे , शेरफोदिन शेख, अनिल दाढेल, अल्पसंख्यांचे अकबर मौलाना, शिवाजी आंबेकर,युवक शहराध्यक्ष पांडुरंग शेटे, बालाजी कपाळे, लक्ष्मण बोरगे, भूषण दमकोंडवार, सत्तार शेख ,गजू कळसकर, विठ्ठल टोनगे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद राठोड तर आभार माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी मानले आहे.
◼️अशोकराव चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे दहिहंडी आयोजक व गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.
__________________________’
शहरातील काँग्रेस दहीहंडीचे आयोजक व तमाम नागरिकांना ,गोविंदा पथकांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे शुभेच्छा दिल्या आणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी नांदेड जिल्ह्याचे विद्येमान पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत ७५ लक्ष रुपयाचा निधी दिला होता .मात्र या महाविकास आघाडीच्या सरकारने या निधीवर स्थगीती आणल्यामुळे हा निधी स्थगीती आहे.असून छ.शिवाजी महाराज शिवप्रेमी व आमचे सहकारी माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी काळजी करू नये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे काम सुरू राहू द्या असे बोलताना जमलेल्या दहिहंडी उत्सवातील नागरिकाला धिर दिला या संदेशाने युवकांनी जय जिजाऊ जय शिवाजी अशा घोषानाने मोंढा परिसरासह शहर दुमदुमले.