दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर जिल्ह्यधिकारी पदी बदली झाली असल्यामुळे त्यांचा आज दि. २ सप्टेंबर रोजी नांदेड येथे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी लोहा न.पा.च्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांचा खारिक खोबऱ्याचा हार घालून सपत्नीक भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, नगरसेवक अमोल व्यवहारे आदी उपस्थित होते.