दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन डोवाल यांचे स्वागत केले. याभेटी दरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.
तसेच अजित कुमार डोवल यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची देखील मुंबईतील राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.