दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
कागणे कोचिंग क्लासेस कंधार च्या वतीने शिक्षक दिनानिमित्त बहुपर्यायी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते .ही परीक्षा 4 सप्टेंबर 2022 वार रविवार रोजी संपन्न झाली .
या परीक्षेला 5 वी ते 10 वी चे विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात परीक्षेस उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला .
या स्पर्धेचे आयोजन कागणे कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा कागणे परमेश्वर सर व बेग सर, गावंडे सर, केंद्रे मॅडम , कनकवळे सर , गोटमवाड सर , अंतेश्र्वर कागणे सर यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कठीण मेहनत घेतली.