दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राजेश गेडाम
काल मध्यरात्री जाहीर झालेल्या नीट या राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालात सनीज शाळेचा गुणवंत विद्यार्थी रोहित गुणवंत भडके याने 720 पैकी 670 गुण प्राप्त केले असून त्याच्या राष्ट्रीय क्रमांक 1685 असा आहे. यावर्षी बारावीच्या निकालातही त्याने घवघवीत यश प्राप्त केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित हा स्प्रिंग डेल शाळेचा इयत्ता पहिली पासूनचा विद्यार्थी आहे व त्याने नीतचा अभ्यास पूर्णपणे ऑनलाईनच केलेला होता. रोहितच्या या नेत्र दीपक यशाबद्दल सत्यम एज्युकेशन सोसायटीचे सचिव व खासदार श्री सुनील मेंढे, कोषाध्यक्ष शुभांगी मेंढे, संचालक श्री अजित आष्टीकर, श्री विनय अंबुलकर, प्राचार्या शेफाली पाल, के.जी. प्रमुख कल्पना जाण जांगळे, प्रायमरी प्रमुख समृद्धी गंगाखेडकर, अकरावी बारावीच्या कॉर्डिनेटर मेधा हलदुलकर यांनी तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्यात.