दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे चिंचवडमधील स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा ६ सप्टेंबर रोजी पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली आहे. यावेळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या ५ महिलांची सुटकाही करण्यात आली. पिंपळे सौदागरमध्ये जगताप डेअरीजवळ कॅसल स्पा इथे वेश्या व्यावसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याठिकाणी एक डमी ग्राहक पाठवून खरेच वेश्याव्यवसाय केला जातो का, हे पडताळून पाहण्यात आले. सापळा लावून वेश्याव्यवसायाचा गोरखधंदा पोलिसांनी उजेडात आणला आहे. या वेश्याव्यवसायाचा जाळ्यातून पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर सीमा धोत्रे आणि रमेश साहिराम याच्या विरोधात भादंवि आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी मुलींकडून अवैधरित्या वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता हे उघडकीस आले.