दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- येथील मा.नगराध्यक्ष,विकासरत्न संजय गाढवे व जिल्हा भाजपा नेते विनोदजी गपाट यांनी सोमवारी १२ रोजी राजभवन मुंबई येथे राज्याचे राज्यपाल माननीय महामहीम मा.श्री भगतसिंहजी कोश्यारी साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची कुलस्वामिनी आई तुळजाभानीच्या दर्शनासाठी व धाराशिव जिल्हा भेटीचे निमंत्रण देण्यात आले.यावेळी तुकाराम नागरगोजे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.