दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : गुजरात, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकामध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. सर्वच पक्षांनी आत्तापासूनच जय्यत तयारी सुरु केली आहे.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृह राज्यात (गुजरात) आम आदमी पक्षाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने गुजरातचा दौरा करत आहेत.