दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालूका अंतरगाव
कोरपणा तालुक्यातील अंतरगाव बु सांगोडा गाडेगाव विरूर रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतं आहे सततच्या पावसामुळे रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्यामुळे एस टी महामंडळाने सांगोडा अंतरगाव गाडेगाव मार्गावरील बस सेवा बंद केली असल्यामुळे बस ही हिरापूर गावरून परत जातं असल्यामुळे सांगोडा अंतरगाव गाडेगाव येथील प्रवाशी्यांना व विध्यार्थी यांना आपली कॉलेज शाळा पकडण्यासाठी पाच ते सात कि. मी चालत जावे लागतं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारमुळे चार गावातील प्रवाशी्यांना व विध्यार्थी यांना नाहक त्रास सहन करावा लागतं असल्याने पालक वर्गामध्ये व नागरिकांमध्ये रोष दिसून येत आहे. येत्या चार दिवसात रस्त्यातील खड्डे बुजविण्यात यावे व विध्यार्थी याच्याकरिता बस सेवा पूर्ववत चालू करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
=========================
युथ इमर्जन्सी कडून आंदोलनाचा इशारा
येत्या चार दिवसात सांगोडा अंतरगाव विरुर गाडेगाव रडत्यातील खड्डे बुजविण्यात यावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागावरविध्यार्थी यांच्या सोबत धडक मोर्च्या काडू असा इशारा युथ इमर्जन्सी चे अध्यक्ष अमोल कळस्कर व त्याच्या संपूर्ण टीम ने दिला आहे.
========================