दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: माजी राज्य ऊर्जामंत्री तथा राहुरी चे विद्यमान आमदार श्री प्राजक्त दादा तनपुरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महावितरण कंपनी मध्ये 5000 पदांच्या विद्युत सहाय्यक भरती निवड झालेल्या देगलूर येथील साईनाथ आऊलवार देगलूरकर याच्या सह, साईकुमार गंदपवार, राज्यवर्धन सोनकांबळे, लक्ष्मण बरसमवार, लक्ष्मीकांत पांचाळ, संतोष हावरगेकर इतर मित्रमंडळी च्या हस्ते ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचाच एक भाग म्हणून काल प्राजक्त दादांनी आपल्या सोशल मीडिया वर जो आव्हान केला होता त्या आव्हानास मी काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून देगलूर येथे शासकीय रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.