दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
माहितीनुसार विक्रध वेधा जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये पाहता येणार आहे
मुंबई: बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेता सैफ अली खानचा बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
सोशल मीडियावर सध्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच निर्मात्यांनी चित्रपटाचा टिझर आणि चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करून चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. माहितीनुसार विक्रध वेधा जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये पाहता येणार आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या बॉयकॉट ट्रेंड घूमाकूळ घालत आहेत. या बॉयकॉट ट्रेंडचा बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या चित्रपटावर देखील परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत दोन बड्या अभिनेत्यांचा चित्रपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. आणि बॉलिवूडचे संपूर्ण लक्ष या चित्रपटाकडे लागले असताना सुप्रसिद्ध चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी एक माहिती दिली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटमध्ये जगभरातील एकूण १०० देशांमध्ये विक्रम वेधा प्रदर्शित होणार आहे. असे सांगितले आहे.
माध्यमाच्या माहितीनुसार, विक्रम वेधा (VikramVedha) जगभरातील उत्तर अमेरिका, यूके, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रमुख देशांसह युरोपमधील २२ देशांमध्ये, आफ्रिकेतील २७ देश आणि जपान, रशिया यांसारख्या देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचपाश्वभूमीवर चित्रपटाच्या सुरक्षेसाठी मुख्य व्यवस्था करण्यात आली आहे.
विक्रम वेधा हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. विक्रम वेधाची कथा पूर्णत: सस्पेन्स आहे. ‘विक्रम वेधा’ हे गुलशन कुमारच्या टी-सीरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स आणि जिओ स्टुडिओ तसेच वाय नॉट स्टुडिओ प्रॉडक्शनच्या बनर खाली तयार झालेला चित्रपट आहे. पुष्कर आणि गायत्री दिग्दर्शित, भूषण कुमार आणि एस शशिकांत निर्मित ‘विक्रम वेधा’ चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.