
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी- श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील ४ आदिवासी बहुल ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या असुन,त्यांचे निवडणूक निकाल सुद्धा जाहीर झालेले असताना,काही राजकीय लोकांकडून या ग्रामपंचायतीचे निवडणूक श्रेय घेण्याचं काम होत आहेत,त्यामुळे काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काही गावाच्या निवडणुकीवर दावेदारी करत अमुक गावाची ग्रामपंचायत अमुक पक्षाची असा उल्लेख करण्यात येत आहे,ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या कोणत्याच पक्षाच्या बॅनरखाली होत नाहीत,ग्रामपंचायत निवडणुकीचा संबंध थेट गावातल्या लोकांची असतो, ग्रामपंचायतआपल्या गावातील सामाजिक ऐकोपा कायम राखण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावातील चांगल्या विचाराची लोक गावविकास तथा गाव हितासाठी एकत्र येतात,आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या उद्देशाने त्या गावातील सामाजिक एकोपा कायम राहावा या उद्देशाने या निवडणुका पक्ष विरहित व स्थानिक सामूहिक नेतृत्वाच्या भरोशावर लढवून विविध जाती-धर्मात गटा-तटाचे हेवेदावे बाजूला सारून लोककल्याणासाठी ह्या निवडणुका घेतल्या जातात,आणि विशेषता ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची मतदार संख्या जास्त आहे अशा गावांना आदिवासी बहुल (पेसा)ग्रामपंचायत दर्जा देण्यात आला,आदिवासी समाजामध्ये उदयनमुख नेतृत्व निर्माण व्हावे या उद्देशाने पेसा अंतर्गत ग्रामपंचायतची निर्माण केली आहे.