दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी कोल्हापूर-संभाजी गोसावी
जिल्ह्यांतील पन्हाळा तालुक्यांमध्ये गिरोली घाटांतून एक धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. यामध्ये चक्क प्रियकराने गुडबाय, असा व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला तो मेसेज प्रेयसीच्या नातेवाईकांनी बघितल्यानंतर नातेवाईकांना चांगला धक्का बसला. प्रेयसीच्या नातेवाईकांनी तातडीने पेठवडगांव पोलीस ठाण्यांत धाव घेतली असता. पोलिसांनी दोघांच्या मोबाईलची लोकेशन तपासले असता गिरोली घाटाकडे पोलीस पेठवडगांव, आणि कोडोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन इचलकरंजीच्या खोतवाडी मधील तरुणी अनुजा प्रकाश चोपडे ( वय २१) हिचा कैलास आनंदा पाटील ( वय २८) याने आदीं खून केला. त्यानंतर त्याने विष प्राशन केले. त्याला तातडीने उपचार दरम्यान सीपीआर रुग्णालयांत दाखल केले मात्र उपचारां दरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. अनुजा आणि कैलास हे दोघे नात्यातीलच होते त्यांनी लग्न करण्यांचा निर्णय घेतला होता. पण अनुजा हिच्या काही नातेवाईकांचा विरोध होता. अनुजाही बी. एस सीचे शिक्षण घेत होती. तर कैलास व्यवसाय करीत होता कैलासने आपल्या मित्रांना माझा गावात मोठा फोटो लावा असे मित्रांना यावेळी तो सांगून गेला होता. मी आज माझे जीवन संपविणार आहे असे तो आपल्याजवळ एक मित्रांना बोलला होता त्याने गुडबाय लाइफ, हे व्हाट्सअप वर स्टेटस ठेवले होते. लग्न होत नसल्यांने कैलास पाटील हा नाराज होता. मात्र तो मेसेज वाचूनही अनुजा चोपडे हिंच्या नातेवाईकांना तर चांगलाच धक्का बसला त्यांनी पोलीस सहकारी समवेत शिरोली घाटाकडे धाव घेतली यानंतर दोन्हीही मृतदेहाचे पंचनामे करण्यांत आले. या घटनेचा तपास पेठवडगांव आणि कोडोली पोलिसांकडूंन तपास सुरु आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा चांगलाच हादरला. दैनिक चालू वार्ताचे पत्रकार श्री.पुरीगोसावी यांनी दूरध्वनीच्या माध्यमांतून घटनेबाबत माहिती घेत धक्कादायक घटनेबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले.