दै चालु वार्ता /
भूम प्रतिनिधी /
नवनाथ यादव
भूम : -भुम येथे ऑल इंडीया पँथर सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ केदार यांनी या मेळाव्याला मार्गदर्शनं केले.यामध्ये देशातील दलीत समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात तरुणानी एकत्र येऊन पँथर च्या माध्यमातून समाजास न्याय दयावा.तसेंच ओबीसी आरक्षण बाबत लवकर जन अंदोलन करनार असे ईशारा शासनाला देण्यात आला.
तसेच अगामी महाराष्ट्रातील नगर परिषद, जिल्हा परिषद निवडनुक हि दलीत, मुस्लिम व ओबीसी यांची मुठ बांधुन लढवणयाचे संकेतहीं दिले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऑड.हृदयानंद सुकाळे, आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, एल. टी. शिंदे, कमलताई गवळी वंचित अघाडी, समाजरत्न लोमटे पत्रकार, राजु माने, राजु साठे, पल्लु काळे, उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवा नेता चंद्रमणी गायकवाड यांनी केले. यावेळी मा दिपक भाऊ केदार यांनी युवा नेता सतत समाजासाठी अन्याय विरोधात लढणारे युव काचे हृदयास्थान चंद्रमणी गायकवाड यांची ऑल इंडीया पँथर मराठवाडा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली.व तसेच भुम तालुक्यातील पाथरूड, वारेवडगाव, घाटनांदुर, हिवरा, यायचार शाखेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी विनोद भोळे पँथर प्रदेश अध्यक्ष, अशोक कसबे पँथर जिल्हा अध्यक्ष, धनंजय अनसुंडे शहर पँथर जिल्हा अध्यक्ष, भैय्या साहेब वाघमारे वाशी तालुका अध्यक्ष, धिरज शिंदे भुम तालुका अध्यक्ष, संदीप सरवदे शहर अध्यक्ष, महेंद्र गायकवाड, राहुल गायकवाड, सचिन शिंदे, मनोज शिंदे, अमोल शिंदे, अजय गायकवाड, राहुल शिंदे, पंकज चौधरी, राज गायकवाड, चिराग गायकवाड, अज्जु वाघमारे, यश गायकवाड, सायरन गायकवाड, आकाश कोरडे, पंचशील गायकवाड, अजय भोसले, नितीन शिंदे आदी उपस्थित होते.