दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- अहमदपुर जि. लातूर येथील कवी विजय गोविंदराव पवार लिखित ” महाराष्ट्र माझा ” या कविता संग्रहाचे प्रकाशन नामदार संजयभाऊ राठोड , अन्न व औषध प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य,यांच्या शुभहस्ते आज दि १९ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात करण्यात आले.त्याप्रसंगी मा. नामदार श्री. संजयभाऊ राठोड, कवी विजय गोविंदराव पवार, डॉ विशाल राठोड (खाजगी सचिव नामदार संजयभाऊ राठोड) ,डॉ. विजयकुमार राठोड (डायरेक्टर , ए वाय एन ग्रुप आँफ हाँस्पिटल अँण्ड इन्स्टिट्यूट) युवानेते संदिपभाऊ राठोड (युवासेना जिल्हाध्यक्ष परभणी ), डॉ सुधीर चव्हाण, विजय राठोड, रंगनाथ चव्हाण, शिवाजी राठोड, सहशिक्षक उदगीर,इंजिनिअर बंडू चव्हाण, मुंबई आणि प्रा भगवान कि. आमलापुरे दिसत आहेत.