दैनिक चालु वार्ता /
नंदुरबार प्रतिनिधी/
संदिप मोरे
तळोदा: नंदुरबार जिल्ह्यात भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था आयोजित बाह्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत गणेश बुधावल ता तळोदा येथे दहा दिवसीय शेळी पालन प्रशिक्षणाचे उद्घाटन सरपंच श्री मंगलसींग पाटील, उपसरपंच श्री अजमेर नाईक, आरसेटी चे संचालक श्री अंकुश खंदारे , उमेद चे प्रभाग समन्वयक श्री सुनिल चाटे यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रशिक्षण दिनांक १३ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे, सदर प्रशिक्षणसाठी एकूण ३१ स्वयं सहाय्यता समूहातील महिलांची निवड करण्यात आली आहे , प्रशिक्षणाचा हेतू स्वयं सहाय्यता सदस्य चे शेती पुरक व्यवसायाचे तांत्रिक आणि शास्त्रीय प्रशिक्षण देणे हा आहे , प्रशिक्षण दरम्यान उद्योजकता विकास कार्यक्रम व बँक व्यवहाराची सविस्तर माहिती दिली जाणार आहे आरसेटी संस्थेचे संचालक श्री अंकुश खंदारे, श्री गिरधर बैसाणे, डॉ फिरोज शेख यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना मार्गदर्शन केले.