दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड:- नांदेड शहरातील हडको परिसरातील ‘श्री अयोध्या दुर्गा महोत्सव’ कार्यक्रमामध्ये, नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देवीची आरती करून मनोभावे दर्शन घेतले.याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. जनार्दन ठाकूर, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. संजय पाटील घोगरे, मंडळाचे अध्यक्ष श्री. वैजनाथ देशमुख, श्री. गजानन कत्ते, श्री. धीरज स्वामी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.