दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: व्याख्यानमालेचे उदघाटन माननीय आमदार जितेशजी अंतापूरकर व माजी खासदार व्यंकटेशजी काब्दे यांच्या हस्ते झाले. पुणे येथील समाज माध्यम तज्ञ मा. मुक्ता चैतन्य व शिक्षणतज्ञ शंतनू कैलासे यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन यावेळी लाभले.*
डाँ.सुनिलभाई जाधव यांच्या सुमधूर व देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, ब्रह्मकुमारीचे संचालिका लक्ष्मी बहेनजी, तहसिलदार मा. राजाभाऊ कदम, PI सोहमजी माछरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी माजी शिक्षण सभापती मिसाळे गुरूजी, माजी नगराध्यक्ष मोगलाजीआण्णा शिरशेटवार, मा.जि.प. सदस्य अनिल पाटील खानापूरकर, निवृत पोलिस उपअधिक्षक रमेशजी कंतेवार, शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील, उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार, माजी शिक्षण व क्रिडा समिती सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर, काँग्रेसचे घोंगडे मँडम, प्रा. गंगाधर हिंगोले, ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशपांडे हसनाळकर, मराठा महासंघाचे जयदीप वरखिंडे, विठ्ठलराव चुकाबुटले, डाँ. धमनसुरे, प्रशांत पाटील आचेगावकर, राष्ट्रवादीचे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष माधवराव फुलारी, शिवा संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव मजगे, वंचितचे तालुका अध्यक्ष संजयभाऊ कांबळे, भाजपाचे अशोकआण्णा साखरे, दिगंबर सावकार कौरवार, बालाजी पाटील, जेष्ठ नागरिक संघाचे भाऊसाहेब मोरे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुरेश चप्पलवार, शिक्षक संघटनेचे विश्वनाथ पाटील केदारकुठेकर, शिक्षक सेनेचे गोविंद सुवर्णकार, जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे संतोष शिंदे, उत्तमराव वाडीकर, एकनाथ टेकाळे, विस्तार अधिकारी कानडे साहेब व अनेक शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सरपंच मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.