दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा : –लोहा तालुक्याची आदर्श शाळा जि.प.प्रा.शाळा धानोरा(देशमुख) येथील कृतिशिल क्रियाशिल कार्यत्पर विद्यार्थीप्रिय कर्तव्यदक्ष शिक्षिका सौ.सुरेखा सदाशिवराव नरंगले यांना भाद्रा येथील शिक्षण परीषेदेत शिक्षक काँग्रसच्या वतीने दर वर्षी दिला जाणारा व या वर्षीचा २०२२ चा कै. डाँ. शंकराव चव्हाण ज्ञानरत्न शिक्षक पुरस्कार नांदेड दक्षिणचे आ मोहन आण्णा हंबर्डे , माजी आमदार रोहिदास रावजी चव्हाण , जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे गटशिक्षण अधिकारी रवींद्र सोनटक्के , नगरसेवक संभाजी चव्हाण , शिक्षक काँग्रेसचे राज्य कोषाध्यक्ष प्रकाशजी मुंगल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दिमाखदार पुस्कार सोहळ्याचे आयोजन शिक्षक काँग्रेसचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते रमेश पवार यांनी केले तर प्रास्ताविक या कार्यक्रमाचे आयोजक विठूभाऊ चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरस्वती अंबालवाड, केंद्रप्रमुख श्री मदन नायके केंद्रीय मु.अ.चंपतराव सावळे सर,शिक्षक ,जिल्हा सल्लागार बाबुराव कैलासे ,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर,मुर्तुज शेख सर, जय महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर पवार
सायाळचे सरपंच अन्नाराव पवार पांगरीचे सरपंच भरत कोपनर,उपसरपंच माधव पा.बुद्रूक,शा.व्य.स.पांगरी अध्यक्ष भारत पवार,माऊली पा बुद्रुक ,भाद्रा शा.व्य.समिती अध्यक्ष अंकुश चिंचोरे उपाध्यक्ष मुंजाजी चिंचोरे भाद्रातांड्याचे शा.व्य.समिती अध्यक्ष राजेश पवार,सरपंच प्रतिनिधी शेषराव पा.चिंचोरे,केशव पा.पवार संग्राम पा.चिंचोरे,खंडू पा.पवार,मारोतराव पा.पवार,रेषमाजी चिंचोरे संभाजी पा.पवार,अर्जुन पावार,ऊत्तमराव पवार,भिमराव पा.पवार,श्रीकांत चिंचोरे भगवान पानपत्ते आनेक मान्यवरांच्या व शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. लोहा येथील पञकार विलास सावळे विनोद महाबळे दैनिक चालु वार्ताचे उपसंपादक गोविंद पा पवार प्रेस पञकार संघाचे तालुकाध्यक्ष शिवराज पा पवार , यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाद्रा येथील शिक्षण परीषद जिल्हा परिषद शाळा भाद्रा , भाद्रा तांडा,जिल्हा परिषद शाळा पांगरीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारोती बट्टववाड सर,गौंड सर,परषुराम मिरेवाड सर,संजय बनसोडे सर,नलबलवार सर,श्रीमंगले मॅडम राज्यपुरस्कार प्राप्त काशिनाथ शिरसिकर सर,बळी जाधव सर,ज्ञानोबा केंद्रे सर,परमेश्वर तिडके सर,सय्यद शेख सर,यांनी विशेष प्रयत्न केले.हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात शानदारपन्ने संपन्न झाला.