दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
यवतमाळ– अरुणाचल प्रदेशांतील भारत आणि चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना यवतमाळ जिल्ह्यांतील सुपुत्राला वीरमरण आले. १६००० फोटो उंचीवर ड्युटीवर असताना लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांना श्वांस घेण्यांस त्रांस झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयांत दाखल केले असता मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणजोत मावळली. यवतमाळ जिल्ह्यांतील वनी गावचे सुपुत्र कर्नल वासुदेव भारत-चीन सीमेवर कर्नल वासुदेव आवारी हे १७० फिल्ड रेजिमेंटमध्ये कर्तव्यांवर होते. वासुदेव आवारी यांना नुकतीच मेजर पदावरुन लेफ्टनंट कर्नल या पदावर त्यांना बढती मिळाली होती. ते अरुणांचल प्रदेशांतील भारत-चीन बॉर्डरवर समुद्र पातळीवर १६००० फुट उंचीवर कर्तव्य बजावत होते. बुधवारी दुपारच्या सुमारांस त्यांना श्वांस घेण्यांस त्रांस होऊ लागल्यांने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तकाळ गुहाटीतील १५१ मिलिटरी बेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले मात्र सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. वासुदेव आवारी यांच्या जाण्यांमुळे वनी गावासह यवतमाळ जिल्ह्यांत शोककळा पसरली.आज सायंकाळी त्यांच्या पार्थिंवावर शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यांत येणार असल्यांची माहिती यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासनाकडूंन मिळाली.