दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांवर जोरदार तोफ डागली. पण, आता शिवसेनेचे पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोग आता आज 7 ऑक्टोबर रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे. शिवसनेचं धनुष्य बाण चिन्ह कोणाला मिळणार? या संदर्भात आज शुक्रवारी 7 ऑक्टोबर निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट कागदपत्रं सादर करणार आहे. एकनाथ शिंदे गट सातत्याने आम्हीच शिवसेना असून आमच्या बाजूने विधीमंडळ पक्षातील एकूण सदस्य़ांपैकी दोन तृतीयांश सदस्य सोबत असल्याचं सांगत आहे.
शिंदे गटाने विधिमंडळ पक्षातील एकूण सदस्य़ांपैकी दोन तृतीयांश सदस्य आपल्यासोबत असल्याचं सांगत आहे आपल्याला शिवसेनेचं निवडणूक चिन्हं मिळावं असा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता. निवडणूक आयोगाने आयोगाच्या नियमाप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करण्यास सांगितले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस बजावली होती. एकनाथ शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला कागदपत्रांच्या प्रतिलीपी द्याव्यात असे आदेश दिले. शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत कोणतेही कागदपत्र मिळाले नसल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे. अजूनही दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे अंधेरीची पोटनिवडणूकक जाहीर झाली आहे, त्यामुळे अशा स्थितीत आयोगाला काय निर्णय घेतं हे पाहण्याचं ठरणार आहे. शिवसेनेनंही मुदतवाढ मागितली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहण्याचे ठरणार आहे.