दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा न.पा.चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा न.पा. चे प्रभाग ६ चे कर्तव्यदक्ष नगरसेवक संदीप दमकोंडवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वार्डातील ३०० महिलांना पंढरपूरच्या विठ्ठलाचे महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता तुळजाभवानी मातेच्या व शिंगणापूर येथील माहादेवाच्या दर्शनासाठी खाजगी बसने मोफत नेले.
लोहा न.पा.चे प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक संदीप दमकोंडवार यांचा आज दि.10 ऑक्टोंबर रोजी आहे . आपल्या वाढदिवसानिमित्त इतर अवाढव्य खर्च वायफळ खर्च न करता त्यांचे राजकीय गुरू लोहा न.पा. चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वार्डातील गोरगरीब सर्व जाती धर्माच्या माता भगिनींना.पढरपुर शिंगणापूर व माता तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मोफत खाजगी बसने नेले . या महागाईच्या काळात अनेक महिलांची इच्छा असुनही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाचे शिंगणापूरच्या माहादेवाचे मामा महाराष्ट्राची कुलस्वामिनी माता तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी खर्चिक बाब असल्यामुळे जात येत नाही.
तेव्हा आपल्या वाढदिवसानिमित्त वार्डातील गोरगरीब सर्व जाती धर्माच्या महिलांना नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शिंगणापूर व तुळजापूर येथील माता तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी खाजगी बसने ३०० महिलांना दर्शनासाठी नेले .
यावेळी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, नगरसेवक नबीसाब शेख नगरसेवक अमोल व्येव्हारे युवा नेते सचिन सावकार सुर्यवंशी राजु पाटील बोडखे साई तेलंग नागेश संगवे राजु पवार गोविंद नळगे प्रभागातील सर्व नागरीक उपस्थित राहुन नगरसेवक संदीप दमकोंडवार व पंढरपूर शिंगणापूर तुळजापूर ला दर्शनासाठी जाणाऱ्या माता- भगिनींना शुभेच्छा दिल्या.