दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
““””””””””””'””””
परभणी : राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. ना. तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.
याप्रसंगी राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार डॉ. फौजिया खान, जिंतूरच्या भाजपा आमदार मेघना बोर्डीकर, पाथरीचे कॉंग्रेस आमदार सुरेश वरपूडकर, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार बाबाजानी दुर्रानी, शिवसेनेचे विधानपरिषद सदस्य विपल्व बजोरिया, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, यांच्यासह अनेक अधिकारी व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.
तब्बल नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर आज झालेल्या नियोजन समिती बैठकीत अनेक विकासकामांना मंजूरी देण्यात आली. सकाळी ११ वाजता पूर्णा जंक्शन येथे आलेले पालकमंत्री ना. सावंत पूर्णेहून परभणीला शासकीय वाहनाने आले. नियोजित बैठक व त्यानंतर सत्कार, विविध विषयांवर चर्चा व पुन्हा त्याच मार्गाने प्रयान झाले.