दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने म्हसळा नगर पंचायतने शालेय विद्यार्थ्यांन साठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयचा विकी संतोष पाटवाड, प्राची हरिचंद्र गाणेकर, जिगर जितेंद्र भुवड, हर्षदा अनंत कोबनाक या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकीवाला वक्तृत्व स्पर्धेत भेकरे अनिश अनिल, प्रीती नरेंद्र कारभारी, भगत सानिका प्रभाकर, या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकीवाला. आणि रांगोळी स्पर्धेत केंद्रे रेश्मा नथुराम, मोहिते सिमरन राजेंद्र, जोशी निकिता विनोद यांनी उल्लेखनीय यश मिळविले, पारितोषक वितरण समारंभ नगराध्यक्ष असहल कादरी, उपनगराध्यक्ष सुनील शेडगे, मुख्याधिकार मा. मिलिंद उकिर्डे, नगर सेविका राखी करंबे, जयश्री कापरे, प्रियांका चव्हाण, यांच्या उपस्थित पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य प्रकाश हाके, स्कुल कमेटी चेअरमन समीर बनकर, प्रा. सौ कल्पना देवगावकर मॅडम यांनी अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रा. सौ वैशाली जमदाडे, प्रा. वैशाली खुताडे प्रा मेघश्याम लोणशीकर, प्रा चक्रधर चव्हाण, प्रा, गुलाब सिंग गावित यांनी केले सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.