दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अकोला दि. जोशाब रुक्मिणीनंद बहुउद्देशीय संस्था. अशोक क्रीडा मंडळ .भीम क्रांती युवक मंडळ .जय गुरुदेव सेवा मंडळ .तथागत बहुउद्देशीय संस्था .डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था .वऱ्हाड विकास व क्रीडा संस्था .आणि बहुजन जनता दल वैद्यकीय कामगार आघाडी अकोला जिल्हा .यांच्या संयुक्त विद्यमाने चांदूर खडकी जिल्हा अकोला येथे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाचे आयोजन दि.३० ऑक्टोबर रविवार रोजी संध्याकाळी ५ते१० वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे पुणे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे तर अध्यक्षस्थानी लख्खु आप्पा लोखंडे (माजी सभापती जिल्हा परिषद )अकोला उपस्थितीत राहणार आहेत. आमदार रणधीर सावरकर डॉ संजय खडसे (अकोला जिल्हा उपाधिकारी )अलकाताई अरुण रणधीर (संस्थापक अध्यक्ष रयत कष्टकरी मजूर कामगार संघटना पुणे )पुष्पाताई इंगळे (माजी जि प अध्यक्ष )गजानन भाऊ अहमदाबादकर (माजी सभापती जि प अकोला )डॉ संतोष हुसे (बहुजन नेते )दयाराम बावने (माजी शिक्षण गट अधिकारी )अरुण आठवले (एपीएस )वैभव महावरे (चांदुर सरपंच )अनुराधाताई डाबेराव (चांदुर उपसरपंच )आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत
भीम शाहीर देविदास सावेकर यांच्या भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तेव्हा चांदूर खडकी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे विलास मोरे चिंतामण इंगळे विकास जाधव नारायण वानखडे राजपाल सुरवाडे श्रीकृष्ण वानखडे अरुण मोरे आदींनी आव्हान केले आहे असे बहुजन जनता दल वैद्यकीय कामगार आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष विलास मोरे यांनी कळविलेले आहे