दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणारे किरणभाऊ डोईफोडे यांच्याकडून दिपावली निमित्ताने प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रभागातील जनतेला मिठाई वाटप करण्यात आली.
दिपावली हि नवचैतन्याची प्रकाशाची गोड धोड खावु खाण्याची दिपावली हिच दिपावलीची ओळख आहे. सर्वानी ऐकत्र येवुन एकमेकांच्या सुखःदुखात सहभागी होवून सण साजरे करावे अशी प्रेरणा हिंदू संस्कृती देते ह्याचे दर्शन म्हणजे लोहा शहरात सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे व आपल्या उत्कृष्ट कार्यशैलीने लोहा शहरात नावलौकिक असलेले किरणभाऊ डोईफोडे यांनी प्रभाग क्रमांक १ मध्ये दिपावली निमित्त सर्व नागरिकांना मिठाई वाटप करुन शुभेच्छा दिल्या.