दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- दि:- २८/१०/२०२२ रोजी नागझरी ता.अहमदपूर जि. लातूर येथील अनिल शिवराज इप्पर व शिवराज इप्पर यांच्यावर जाणलेवा हमला सायंकाळी सहाच्या च्या सुमारास घडली आहे अनिल इप्पर वय वर्ष(३०) यांच्या डोक्यात रॉड घालून तर शिवराज इप्पर वय वर्ष (७०) यांच्यावर कटीने वार करण्यात आहे आणि काही दिवसांपूर्वी सुद्धा दि:- ०७/०८/२०२१ रोजी सायंकाळी अनिल शिवराज इप्पर यांच्यावर दगड फेकून डोकं फोडलं वारंवार त्यांच्यावर हमले होत आहेत तरी त्यांना न्याय मिळत नाही आणि प्रशासन त्यांना दुर्लक्ष करत आहेत जर त्या व्यक्तीचा काही बर वाईट झाले तर याला जबाबदार कोण ?
आणि दि:- २९/१०/२०२२ रोजी परत त्यांच्यावर व त्यांचे वडील यांच्यावर हमला करण्यात आला तरी त्या दिवशी मदतीसाठी सदर पोलीस स्टेशन किनगाव येथे संपर्क केला असून त्यांना कसलीच मदत भेटली नाही आणि मी राठोड रमेश दैनिक चालू वार्ता पत्रकार अहमदपूर तालुका प्रतिनिधी मी स्वतः कॉल केला पोलीस स्टेशन येथे तर मला त्यांनी अशी माहिती दिली की दिवाळी च्या सुट्या असून काही कर्मचारी हजर नाहीत मंग मी त्या दोघांना प्रावीट गाडी करून त्यांना पोलीस ठाण्यात पोहचवलो पोहचल्यानंतर काही कर्मचारी हजर होते त्यांनी त्या दोघांना सदर शासकीय रुग्णालय कीनगाव येथे पाठवले उपचारासाठी आणि मेडिकल झाल्याच्या नंतर या असे सांगून त्यांना पाठवले त्यांनी मेडिकल करून परत पोलीस ठाण्यात आले असता पोलीस ठाण्यात एकही कर्मचारी नाही व पोलीस स्टेशन मधील लाईट पण बंद होती आणि पोलीस स्टेशन चा मनमानी कारभार दिसून येत आहे तरी पोलीस स्टेशन ची कसलीच मदत झाली नाही. नंतर 100 नंबर ला कॉल करून सुद्धा मदत मिळाली नाही पोलीस स्टेशन ची मदत भेटणार कधी? हा विचार जनतेला पडला आहे. आणि दि :- २९/१०/२०२२ रोजी जेही कर्मचारी नाईट दिवटी ला होते त्यांनी रात्री १२.४३ वाजता पोलीस स्टेशन मधील लाईट बंद करून कुठे गेले होते हे चौकशी करावी आणि त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही करून त्या व्यक्तीला न्याय मिळवून द्यावे