
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : पंढरपूर – सांगोला मिरज रस्त्यावर जुनोनी जवळ पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना वाहनाने धडक दिली आहे. या वाहनाच्या धडकेत काही वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय.
सदर वारकरी जठारवाडी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे समजते. कर्तिकी वारीसाठी हे वारकरी पंढरपूरकडे पायी चालतं येत होते.
मृत झालेल्या वारकऱ्यांमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
वाहनाच्या धडकेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.