दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
सुंदरा आली आली सुंदरा
केसांचा संभार अनोखा
भाळी चंद्रकोर साजिरा
नाक जणू चाफेकळी
गुलाबी गाली पडते खळी
ओठ जणू गुलाबाची कळी
बोलण्यात साखरेचा गोडवा
लाजत मुरडत कंबर लचकत
आली आली सुंदरा
अंगी चोळी काचली जरी
पैठणीवर मोरच भारी
खांद्यावर भरजरी टाकूनी
शेला
चालण्याचा जणूभारीच
तोरा
लाजत मुरडत आली
सुंदरा
भांगामध्ये बिंदी लखलखे
कर्णफुले कानी डुलते
नाकामध्ये नथनी शोभे
गळ्यात सुंदर अलंकाराचा घेरा
लाजत मुरडत आली
सुंदरा
बाजुबंद दिसती सुंदर
बिल्वामध्ये आरशाची
जडण
कंबरपट्यावर जाते नजर
पायी पैंजणाचा नाद
छुमछुम
जणू सौंदर्याची खाण
सुंदरा
लाजत मुरडत आली
सुंदरा.
कवयत्री:- डॉ नीता गोडबोले
(दि गुड पिपल्स फौंडेशन पुणे जिल्हा आरोग्य समिती महिला सहअध्यक्षा )