दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:पंढरपूर येथे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांना माहात्मा जोतीराव फुले शिक्षण परिषदेच्या वतीने 2022 चा राष्ट्रीय आदर्श कार्यगौरव युवा रत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पंढरपूर येथील नगरसेवक डि राजा गौड साहेब व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष समाजसेवक नितीनजी काळे साहेब यांच्या वतीने वीर सावरकर चौक पंढरपूर येथील कार्यालयाजवळ देगलूर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांचा मोठा पुष्पहार टाकून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नगरसेवक डि राजा गौड साहेब भाजपा प्रदेश उपाध्यक्ष नितीनजी काळे साहेब रवी भांडे राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे देगलूर शहर उपाध्यक्ष भोलानाथ जोशी यांच्या सह आदी उपस्थित होते..