दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
माळी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुणे जिल्हा तसेच इंदापूर तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.या निवडीचा नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम इंदापूर येथे माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांच्या अध्यक्षतेखाली व माळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ.सोमनाथ बोराटे, मुंबई हायकोर्टाचे ॲड. नितीन राजगुरू, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रकाश गडवे, सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सौरभ शेंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक कार्याध्यक्ष करण झगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी विकास शिंदे यांची पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी मळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे तसेच पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांत वाघोले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.त्याचबरोबर इंदापुर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या देखील निवडी पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विकास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आल्या.
या निमित्ताने अनाथ आश्रम शाळेत दिवाळी वाटपाचा कार्यक्रम देखील विकास शिंदे यांनी ठेवला होता, तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की समाज संघटन करत असताना संघटन याचा अर्थ असा की समाज एकत्र करणे त्यांच्या अडचणी सोडवणे तसेच समाजात वावरत असताना एकमेकांबद्दल गैरसमज हे आपापसात मिटवून मी हा शब्द न वापरता आपण किंवा आम्ही हा शब्द जर आपण अमलात आणला तर कुठलीही अशक्य गोष्ट आपण साध्य करू शकतो. तसेच जर समाज एकत्र असेल तर समाज पुढे जाण्यासाठी काहीच अडचण येणार नाही परंतु आज आपला माळी समाज फार विखुरलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकमेकांचे पाय खाली खेचण्याचे चालू आहे. त्यामुळे आपला समाजाचे फायदा सर्वजण उठवत आहेत.
आपला एवढा मोठा समाज असून देखील आपल्या समाज्यामध्ये एकी नाही याची खंत वाटते. प्रत्येक ठिकाणी समाजात स्वार्थ आणि मी हे शब्द गाजवले जातात त्यासाठी कुठलेही गोष्टीची लिमिट असते आपण तर माणूसच आहोत आणि माणूस म्हणूनच जगले पाहिजे माणूस म्हणून समाजाच्या काहीतरी कामाला आले पाहिजे तसेच मी हा शब्द काढून आपण हा शब्द वापरला पाहिजे .कारण निर्जीव वस्तू सुद्धा जाता जाता फार मोठा आवाज करून जाते, जशी की ती वरून पडली की काहीच कामाचे राहत नाही परंतु आवाज मात्र मोठा करते शेवटच्या वेळेस तसेच मी ह्या शब्दाचे देखील तसेच आहे, मी करण्यासाठी बराच आवाज करावा लागतो परंतु तो कायमचा नष्ट होतो जीवनातून, तसेच विकास शिंदे पुढे बोलताना म्हणाले की आजच्या पेक्षा ही पुढील येणाऱ्या कार्यक्रमाला याच्या पेक्षाही भारी कार्यक्रम होईल अशी त्यांनी ग्वाही दिली.
या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आल्याबद्दल माळी महासंघातील प्रमुखांचे, इंदापूर मधील व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे आणि इतर मंडळींचे आभार विकास शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमाला माळी महासंघाच्या माळी संघाचे शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी इतर प्रमुख पाहुणे तसेच त्या पलीकडे जाऊन मराठा, मुस्लिम समाजाचे देखील बांधव उपस्थित होते, यावरूनच त्यांचे कार्य लक्षात येते की समाजात त्यांचे किती वाढते स्थान आहे. असे उद्गार पश्चिम महाराष्ट्र माळी महासंघाचे महासचिव चंद्रकांत वाघोली यांनी काढले, तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की दवाखान्याच्या बाबतीत त्यांना कोणाचा जरी फोन आला तरी ते सर्वप्रथम पुढे असतात . कोरोना महामारीच्या काळात देखील त्यांनी हे कामगिरी बजावलेली आहे.
तसेच कचेरीतील इंदिरा गांधी चे प्रकरण त्यांच्या माध्यमातून अनेक प्रकरणे त्यांनी मार्गे लावली आहेत. कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी देखील आनंद व्यक्त केला व महाराष्ट्राबरोबर पश्चिम महाराष्ट्रात आपण माळी महासंघाचे काम वेगाने चालू आहे, याचा देखील अभिमान बाळगला. या कार्यक्रमानिमित्त सर्व निर्वाचित पदाधिकाऱ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या व आभार मानले.
तसेच आजच्या या कार्यक्रमावरून अनुभव आला की विकास शिंदेची धडपड पाहून निवड केलेली व विश्वास दाखवलेला सार्थ ठरवला . विकास शिंदे हा गरीब कुटुंबातील मुलगा आहे त्यामुळे त्याला गरिबीची जाणीव आहे. आणि त्याची एकच खासियत की अगोदर सर्वांना मान सन्मान आणि मग शेवट आपण त्यांनी हे त्यांच्या आजच्या कार्यक्रमातून दाखवून दिले. करण ते स्वतः कार्यक्रमाला उभा राहून कार्यक्रमाची देखभाल चालू असताना देखील त्यांची सर्व साईटला नजर कमी जास्त सर्व नियोजन पाहत होते. प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे यांनी त्यांच्याबद्दल एक सर्वात महत्त्वाचा शब्द सांगितला की त्यांच्यात मी पणा हा शब्द अजिबात नाही म्हणूनच हे आज सर्वजण उपस्थित आहेत. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष रमेश तिखे यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी माळी महासंघाचे इंदापूर तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विजय शिंदे, युवराज शिंदे, मुकुंद शिंदे, स्वप्निल गदादे, शहाजी जाधव,सुरज शिंदे, निखिल शिंदे, गणेश राऊत, सुरेश राऊत यांनाही नियुक्ती पत्र देण्यात आली.या कार्यक्रमासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.