दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
गेवराई :दि. ७ ( वार्ताहार ) : –
महाराष्ट्र राज्य कुमार गट कबड्डी संघाच्या निवड समिती सदस्यपदी व प्रशिक्षकपदी प्रा. डॉ. केतन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. शारदा ॲकॅडमीचे उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. गायकवाड यांची निवड झाल्याने, त्यांच्या रुपाने बीड जिल्ह्य़ातल्या ग्रामीण भागाला प्रतिनिधित्व मिळाल्याने क्रीडा जगतात आनंद व्यक्त केला जात असून, त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
48 व्या कुमार – कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा बालेवाडी जिल्हा पुणे झाल्या होत्या.
अहमदपूर (लातूर) या ठिकाणी खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर 04 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या काळापर्यंत सुरू राहील. त्यानंतर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा उत्तराखंड येथील ऋषिकेश या ठिकाणी 17 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होतील. या प्रशिक्षण शिबिरातून महाराष्ट्राच्या कुमार व कुमारी गटाचा संघ निवडण्यात येत आहे उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत हे कुमार मुलांचा संघ महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन च्या वतीने कुमार गटाच्या प्रशिक्षक म्हणून एन .आय .एस.कोच प्रा. डॉ. केतन गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. म.शि. प्र. मंडळाचे बलभीम महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागाचे अधिव्याख्याता प्रा.डॉ. केतन कैलास गायकवाड यांची गेल्या वर्षी दिल्ली येथे 2018 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या शालेय राष्ट्रीय 19 वर्षे वयोगटाच्या स्पर्धेसाठी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. व यापूर्वी हरियाणा येथे झालेल्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रशिक्षक म्हणून पद भूषवले आहे.
प्रा. डॉ. केतन गायकवाड हे महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस माजी अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई येथे हिंद क्रीडा मंडळ संचलित ,शारदा स्पोर्ट्स अकॅडमी येथे कबड्डी प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. शारदा कबड्डी अकॅडमीमध्ये राज्यातील व राज्याबाहेरील खेळाडुना तंत्रशुद्ध कबड्डी प्रशिक्षणाचे धडे देत आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध नवोदित होतकरु विद्यार्थ्यांना कबड्डीचे प्रशिक्षण देत आहेत. सातत्याने कबड्डी खेळातील विविध पैलूवर प्रकाश टाकण्याचे काम डॉ. गायकवाड यांनी केले आहे. राष्ट्रीय स्पर्धेकरिता कुमार गटाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल बीड जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित ,महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष तथा रा.काँ सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित , जय भवानी संस्थेचे सचिव
जयसिंह पंडित, बीड जि. प. माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, युवा नेते पृथ्वीराज पंडित ,युवा नेते रणवीर पंडित,अमृत डावकर , जिल्हा कबड्डी असो.चे सचिव प्राचार्य डॉ. विश्वास कदम , प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याध्यापक
प्रमोद गोरकर , जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुहासिनी देशमुख , बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत सानप ,राष्ट्रीय खेळाडू दगडू चव्हाण, प्रा. राजेंद्र बरकसे , प्रा. डॉ. भागचंद सानप ,डॉ. शंकर धांडे ,प्रा. राजेश क्षिरसागर, मधुकर आन्ना गर्जे , डॉ.भिमा माने, ब्रह्मनाथ मेंगडे ,प्रा. अनिल जगदाळे ,डॉ. नागनाथ मोटे,प्रा.तत्तापुरे, डॉ.संतोष घोरपडे यांनी डॉ. केतन गायकवाड यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.
गोपाल मोटे,नितीन निंबाळकर, कैलास जगदाळे, प्रताप शेंडगे,वनराज गिरी, विजय जाहेर, विजय अपसिंगेकर ,प्रा. रविंद्र खरात, मयूर मोटे, आदींनी प्रा. डॉ. केतन गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.