दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतचे 18डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार राज्याच्या निवडणूक आयोगाने आक्टोबर 2022ते डिसेंबर 2022मुदत संपणाऱ्या महाराष्ट्रातील7751ग्रामपंचायतचा कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यामध्ये मंठा तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 35 ग्रामपंचायत निवडणूक होत आहे यासाठी 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20डिसेंबरला मतमोजणी होईल.महाविकास आघाडीने सरकारने थेट जनतेतून सरपंच निवड रद्द केली होती.मात्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पुन्हा सरपंच निवड हि थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतल्यामुळे. सरपंचांची निवड जनतेतून होणार आहे या आधी प्रचाराची जबादारी पॅनल प्रमुख किंवा सरपंचपदासाठी इच्छुकावर होती थेट जनतेतून निवड असल्यामुळे सरपंचचा चेहरा समोर दिसणार आहे त्या कारणाने प्रचारास जोर लावा लागणार खर्च जास्त करावा लागणार आहे हि निवडणूक म्हणजे तालुक्यातील बड्या नेतात्यांना आव्हान ठरणार असून जिल्हा परिषद पंचायत समिती इच्छुक उमेद्वारासाठी महत्वपूर्ण असणार आहे.ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी भेटीगाठीवर भर देत आहेत.निवडणूक असणाऱ्या गावाची नाव.अंभोरा शेळके (स.सं9),आंधवाडी(स.सं. 7),उमरखेडा (स.सं.9), उस्वद(स.सं.9), एरंडेश्वर-कोकरशा(स. सं.7),काठाला खुर्द-कानफोडी(स. सं.9),काठाला बुद्रुक(स. सं.7),कर्णावळ(स.सं.7),
कोकरंबा(स.सं.7), गुळखंड(स.सं.7),गुळखंड तांडा-मोसा(स.सं.7),गेवराई(स. सं.7),जांभ्रूण-तुपा(स.सं.7), टाकळखोपा ,(स.सं.7), ठेंगे वाडगाव(स.सं7),तळणी(स.सं.13) तळतोंडी-मुरूमखेडा,(स.सं.7), तळेगाव(स.सं.7), दहा (स.सं.7),देवठाणा मंठा(स.सं7), नायगाव प्र. बाम्हणी(स.सं.7),पाकणी(स.सं.7),पाडळी दुधा(स.सं.9),बरबडा(स.सं.7),पोखरी केंधळे(स.सं.7), मोहोरा(स. सं.7), मेसखेडा(स.सं.7),राणमळा (स. सं.7), रामतीर्थ(स.सं7), लावणी(स.सं.7),वडगाव सरहद्द(स.सं.7), वाघाला(स. सं.7),वाढेगाव-पांढु र्णा(स.सं.7),,हेलस(स.सं.9), हेलसवाडी(स.सं.7).