दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
युवा नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत महामानवांच्या देखाव्यासाठी बाळासाहेब पाटील खतगावकर,डॉ.सौ.मीनलताई पाटील खतगावकर यांच्या संकल्पनेतील हा सुंदर देखावा पूर्णत्वास आला होता.छत्रपती शिवाजी महाराज (गजानन भोसले),राजमाता जिजाऊ,(ऊमाई पाटील)पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,(शुभांगी पाटील)क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,(प्रतिक्षा भालेराव)राजश्री शाहू महाराज,(विठ्ठल मादाळे),महात्मा फुले,(उध्दव बोमडुले)डॉ.बाबासाहेब आंबेडकर,(अनिल हटकर)राष्ट्रसंत गाडगे महाराज (मारोती पाटील)यांच्या वेशभूषांनी पदयात्रेतील भारत जोडो पदयात्रेतील युवा नेते खासदार राहुल गांधी,नाना पटोले यांच्यासह अनेकांचे लक्ष वेधून घेतले.या महामानवांची रंगभूषा,वेशभूषा कलाध्यापक,बालाजी पेटेकर यांनी केली होती.या देखावासाठी प्राचार्य पिंपळे सर,प्रा्.देगलुरकर,प्रा.पांचाळ सर,प्रा.लेखणे सर,मुख्याध्यापक शेळके सर,शिवाजी पाटील सर,मठपती सर,गायकवाड सर,गाडेगावकर सर,सौ.रेनगुंटवार,सौ.सुरनर,सौ.डोंगरे,सौ.घोंगडे,सौ.केंचे,सौ.रेगुल,यांचे मार्गदर्शन लाभले होते.हा देखावा बघण्यासाठी हा देखावा पाहण्यासाठी सर्वांची एकच झुंबड उडाली होती.या महामानवांच्या वेशभूषेतून भारतातील सर्वधर्मसमभाव,संविधान बचाव आणि समतेने एकजुटीने या देशात आपण नांदुया अशा प्रकारचा उत्कृष्ट संदेश या देखाव्यांनी दिला.या देखाव्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.