दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या होऊ घातलेल्या सिनेट 2022 निवडणूकीचे कार्यक्रम
जाहीर झाले असून या निवडणुकीमध्ये अध्यापक प्रवर्गामध्ये ग्रंथपालांनी आपला उमेदवारी अर्ज विद्यापीठात
दिनांक 01 – 11 – 2022 रोजी सादर केला होता.
विघापीठाने अर्जाची छाननी दिनांक 10 -11 – 2022 रोज गुरुवारी करून ग्रंथपाल हा शिक्षक प्रवर्गात येत नसून त्यांना वर्गात जाऊन अध्यापन करण्याचा अनुभव नसल्याचे विनाकारण कारण पुढे करून ग्रंथपाल याची उमेदवारी नाकारण्यात आले होते.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 बाजूला ठेवून मनमानीपणे निर्णय घेऊन ग्रंथपालाची उमेदवारी नाकारण्याचं नियमबाह्य काम विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले होते .
याबाबत उमेदवार प्रा डॉ विष्णू पवार व मुक्ला विभागीय असोसिएशनच्या वतीने या निर्णयाविरुद्ध दि 11 नोव्हेबर 2022 रोजी आपील विद्यापीठात अपीली अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले होते.
या आपीलीवर दि. 12 नोव्हेबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी निर्णय देत ग्रंथपालास सिनेट निवडणूकीपासून वंचित ठेवण्याचेच काम केले होते .
.विद्यापीठ निर्णय देताना तुटपुंजे कारण केवळ ग्रंथपाल विद्यार्थींना वर्गावर जाऊन अध्यापन करत नसल्याचे कारण पुढे करून निवडणूक प्रक्रियेपासून वंचित ठेवले गेले होते .
विघापीठ आनुदान आयोग आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा – 2016 ( मराठी )मध्ये
पान क्र 6 वर परिछेद अनुक्रमांक 61 नुसार अध्यापक यांची व्याख्या करण्यात आली असून ,यात महाविघालयीन ग्रंथपालांचा स्पष्ठ उल्लेख शिक्षक असा करण्यात आलेला असून कूठेही वर्गावर जावून शिकवणारा शिक्षक म्हणजे अध्यापक अथवा शिक्षक असा उल्लेख कायद्यात केलेला नसतानाही
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने मागील पाच वर्षात आणि वर्तमान परिस्थितीत ग्रंथपालास सिनेट उमेदवारी पासून वंचित ठेवण्याचेच काम केले होते.
या निर्णया संबंधीत विधापीठ कार्यक्षेत्रातील ग्रंथपालाच्या मनामध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होताना दिसून येते होती.
अध्यापक प्रर्वगाच्या यादीत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व ग्रंथपालाचे मतदार यादीत नावे समाविष्ठ असून सुद्धा उमेदवार म्हणूण निवडणूक लढविता येत नाही. हे खेदजनक असल्याची रोषजनक भावना प्रत्येकाच्या मनात खदखद आणि असंतोषाच्या भावनेनचा उद्रेक होत होता .
अध्यापक गटातील यादीत नाव असून सुद्धा एकमेव ग्रंथपालास सिनेट उमेदवार म्हणून निवडणूकीपासून वंचित ठेवण्याच काम महाराष्ट्रातील एकमेव नांदेड विद्यापीठाकडून केले गेले होते .
एकंदरीत ग्रंथपाल त्यांच्या हक्कापासून हेतूपुस्पर दुर ठेवण्याचा तुघलकी निर्णय घेऊन
विद्यापीठ अधिनियन – 2016 च्याही पुढे जाऊन विद्यापीठ प्रशासनाकडून गेली पाच वर्षापासून एकमेव ग्रंथपालाबाबत अवलंबत आसल्याचे दिसून येते होते .
रिटर्निंग ऑफिसरनी ग्रंथपालास टिचिंगचा अनुभव नसल्याचे कारण पुढे करून ग्रंथपालाचा अर्ज बाद ठरवण्यात आला होता.
उमेदवारी अर्ज बाद केल्यानंतर मा. कुलगुरू साहेबांकडे यांची अपील केली होती .
महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठात जसे की गोंडवाना विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे ग्रंथपालांचे सिनेट साठीचे अर्ज पात्र ठरवल्याचे निवेदनात सांगितले होते. तसेच ग्रंथपाल हे शिक्षक कसे आहेत यांचे सर्व पुरावे पण सादर करण्यात आले होते. परंतु कुलगुरू साहेबांनी ग्रंथपालांना क्लासरूम टीचींगचा अनुभव नसल्याचे कारण पुढे करून अर्ज अपात्र ठरवला. विद्यापीठाकडून न्यायाची अपेक्षा संपल्यामुळे
शेवटी सर्व पर्याय संपल्यानंतर सर्व ग्रंथपलानी मा. उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे दि. 14 नोव्हेबर रोजी याचिका दाखल करण्यात आली.
या अपीलावर निर्णय देत मा.उच्च न्यायालयाने ग्रंथपाल हे शिक्षक असून त्यांचे अर्ज निवडणुकीसाठी पात्र आहेत व प्रा डॉ पवार विष्णू मनोहर ग्रंथपाल शिवाजी महाविघालय उदगीर यांचा फॉर्म वैध ठरवण्याचा आदेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांस दिलेला आहे.
या सर्व लढ्यात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व ग्रंथपाल, ग्रंथपालांची मुकला (MUCLA ) संघटना व स्वामुक्टा संघटनेचे सहकार्य लाभले.
हि लढाई माझी एकट्याची नसून संबंध ग्रंथपाल आणि व्यावसायिक बंधुच्या अस्तितवाची होती असे मत माध्यमाशी बोलताना उमेदवार प्रा डॉ विष्णू पवार यांनी व्यक्त केले.