दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णि तालुक्यातील येत असलेल्या सुभाष नगर क्रांतीसुर्य बिरसामुंडा
यांच्या १४७ वी जयंती निमित्ताने १८
नोव्हेंबर २०२२ रोजी सुभाष नगर येथील सर्व समाज बांधवांनी बिरसामुंडा जयंती उत्सव विविध वेशभूषा करण्यात आले तसेच भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले . क्रांतीसुर्य बिरसामुंडा हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक असुन आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान आहे. अशा महामानवाच्या जयंती निमित्त आदिवासी संघटनाच्या वतीने पारंपारिक लोकनृत्य व वाद्या सह
भव्य मिरवणूकीचे आयोजन केले. मिरवणूकीला समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वप्रथम बिरसामुंडा चौक येथे तैलचित्राचे पुजन. शहिद विरपत्नी कुन्तीताई ज्ञानेश्वर आडे अंजनाबाई गेडाम (संरपच) सावळी सदोबा श्री, राजु भाऊ चव्हाण,नुनेश्वर भाऊ आडे इदल महाराज, मारोती गेडाम ( महाजन) देविदास कनाके (घट्या) प्रकाश मंडाळे उमरी यांच्या हस्ते करण्यात आले यात मान्यवरांनी बिरसामुंडा यांच्या मुख्य ठिकाणांवरुन फिरत शेवटी मिरवणूकीची सांगता करण्यात आली. बिरसामुंडा नवयुवक मंडळी जेष्ठ पुरुष आणि महिला मंडळी तसेच घट्या महाजन कारभारी याच्या प्रमुखांनी उपस्थित होते,