दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:आझाद फाऊंडेशन संचलित ग्रुप महाराष्ट्र “‘देगलुर तालुका व शहर कार्यकारणी”पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा आलुर ग्रामपंचायत कार्यालय येथे संस्थापक अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला.
आझाद ग्रुप नांदेड जिल्हा अध्यक्ष बसवंत पाटिल शेळगावकर यांचा विवाह शेळगाव (नृसिंह)येथे वधु वरांना शुभआशिर्वाद देऊण आझाद ग्रुपचे सर्व पदाधिकारी आलुर येथे मेळाव्यासाठी आले.
भिमाशंकर मामा कापसे यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन करत असताना,आपण समाजासाठी काय तरी देण लागतो या करिता आपले दोण घास इतरांना देण्याची कुवत सर्वांनी ठेवली तर परमेश्वर आपल्याला काहीही कमी पडु देणार नाही.व आपण स्वतः आर्थिक बाजुने व आपल कुटुंब सांभाळत संघटनेत काम कराव.गरिब,अपंग,निराधार,प्रशासकिय कामात वेळ लागत असेल तर व कोणावर समाजात अन्याय होत असेल तर अशा ठिकाणी आझाद ग्रुप चा पदाधिकारी पुढाकार घेऊन काम करावे.फाऊंडेंशणच उद्देश निस्वार्थ भावनेन सेवा करावे हे उद्दिष्ट ठेऊण च आझाद ग्रुपमध्ये प्रत्येक पदाधिकारी काम करावे.हि भावना यावेळी भिमाशंकर मामा कापसे व्यक्त केले.
यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष प्रभाकर पांडे कौठेकर, लोकनियुक्त सरपंच लांडगेवाडी बाळासाहेब टोपारे, उपसरपंच गंगाधर हत्ते कौठा,लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटिल भोस्कर,कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांचाळ,कंधार तालुकाऊपाध्यक्ष सोमनाथ कापसे,प्रकाश कोल्हे सामाजिक कार्यकर्ते,बाबु गोविंदराव पाटिल आलुरकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देगलुर,मा.ऊपसरंपंच ईरवंत शिंगाडे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जि.प.क्रे.प्रा.शाळा आलुर नागनाथ कुर्लेपवार,नरेश पाटिल आलुरकर,संग्राम सिताफुले,व देगलुर तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते.